नवीन लेखन...

गायिका और फ़िल्म निर्माता अभिनेत्री कानन देवी

कानन देवी यांचे नाव ‘कानन बाला’ होते. कानन देवी यांचा जन्म बंगाली परिवारात झाला. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. आपल्या वडिलाच्या निधनामुळे लहानपणीच आईला मदत करू लागल्या होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी ‘ज्योति स्टूडियो’ निर्मित ‘जयदेव’ या बंगाली चित्रपटात काम केले. १९३४ साली आलेल्या मा या चित्रपटापासून नाव झाले. नंतर कानन देवी मुंबईला आल्या व न्यू थिएटर मध्ये हिंदी चित्रपटात गाणे व अभिनय असे दोन्ही काम करू लागल्या, त्या साठी उस्ताद अल्ला रखा व भीष्मदेव चटर्जी याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागल्या. १९३७ मध्ये आलेल्या ‘मुक्ति’ या चित्रपटाने कानन देवी यांना न्यू थिएटरच्या पहिल्या कलाकारा मध्ये नेऊन बसवले. १९४१ मध्ये कानन देवी यांनी न्यू थिएटर सोडले व स्वतंत्रपणे काम करू लागल्या. १९४२ साली आलेल्या ‘जवाब’ हा चित्रपट कानन देवी यांचा सर्वाधिक हिट समजला जातो. यातील “दुनिया है तूफान मेल”, हे गाणे खूपच गाजले. या नंतर कानन देवी यांचे ‘हॉस्पिटल’, ‘वनफूल’ व ‘राजलक्ष्मी’ असे हिट चित्रपट आहे.

१९४८ साली आलेला ‘चंद्रशेखर’ हा कानन देवी यांचा शेवटचा चित्रपट. ज्यात अशोककुमार हिरो म्हणून होते. १९४९ मध्ये कानन देवी यांनी ‘श्रीमती पिक्चर्स’ या नावाखाली वामुनेर में, अन्नया, मेजो दीदी, दर्पचूर्ण, नव विद्यान, आशा, आधारे आलो, राजलक्ष्मी ओ श्रीकांता, इंद्रनाथ, श्रीकांता, औ अनदादीदी या चित्रपटांची निर्मीती केली होती. १९७६ साली त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कानन देवी या पहिल्या बंगाली अभिनेत्री होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी साठ चित्रपटात काम केले. त्यांचे उल्लेखनीय चित्रपट ‘जयदेव’, ‘प्रह्लाद’, ‘विष्णु माया’, ‘माँ’, ‘हरि भक्ति’, ‘कृष्ण सुदामा’, ‘खूनी कौन’, ‘विद्यापति’, ‘साथी’, ‘स्ट्रीट सिंगर’, ‘हार-जीत’, ‘अभिनेत्री’, ‘परिचय’, ‘लगन’, ‘कृष्ण लीला’, ‘फैसला’ और ‘आशा’.

कानन देवी यांनी अभिनय व पार्श्वगायन या दोन्ही क्ष्रेतात नाव कमवले होते. कानन देवी यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..