नवीन लेखन...

“काव्यस्फूर्त उर्मी”

कोणत्याही भाषेतील अवघड वाङ्प्रकार म्हणजे कविता कारण त्यासाठी लागते प्रचंड शब्दसंपदा, सृजनशील मन आणि मुख्य म्हणजे निरीक्षण, आणि तेव्हा कुठे वाक्य रचना जुळून साकार होते ती कविता, त्यांच्या काव्यरचना, चारोळ्या ऐकल्यावर लक्षात येतं अशीच नेमकी प्रचिती येते कळव्याच्या उर्मिला भूतकर यांच्या सहज, सोप्या, सत्य काव्य पंक्ती ऐकल्यावर काही मिनीटातचं शब्दांची गुंफण करुन प्रत्येकाच्या मनाला आनंदही मिळेल, इतकं वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण त्या कवितेतनं करत असतात. विषय कोणताही असो, वाक्यांना अलंकारिक स्वरुप देत, त्यांच्या साहित्यशैलीतून निर्मिती होते एका आशयपूर्ण कृतीची.

खरंतर लहानपणीच वडिलांचं छत्र हरपल्यानं अत्यंत हलाकीची परिस्थिती उर्मिलाताईंवर आनि त्यांचा कुटुंबियांवर ओढअवली, त्यामुळे मॅट्रिक चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच नोकरीसाठी पायपीठ सुरु झाली. कालांतराने राज्यशासनाच्या बांधकाम विभागात त्या रुजू झाल्या. पण हे क्षेत्र कलेच्या आणि साहित्याशी निगडीत नसूनही उर्मिला ताईंनी, आपल्या छंदाचा वापर या क्षेत्रात पुरेपूर करुन घेतला म्हणजे बांधकाम विभागातर्फे जर कोणत्याही इमारतीचं, सेतू, उड्डाणपुलाचे उद्घाटन किंवा भूमी पूजन असल्यास त्याची “स्वागत गीते” रचण्यासाठी हमखास उर्मिला भूतकरांनाच बोलवणं येई.

पण याबाबतची नेमकी आवड नेमकी कुठून निर्माण झाली असं विचारलं असता उर्मिला ताई म्हणतात. “माझी आई जात्यावर पीठ दळताना, सुंदर ओव्या म्हणत असे, कदाचित तिच्याकडूनच हा वारसा मला मिळाला असावा.

निवृत्ती नंतर भूतकरांनी आपल्या छंदाचा व वेळेचा पुरेपूर सदुपयोग केला. ज्ञानरंजनाने परिपूर्ण असा “उर्मी” हा कार्यक्रम त्या सादर करु लागल्या या एकपात्री प्रयोगाला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. त्यासोबतच विविध काव्य स्पर्धांमध्ये तसंच साहित्य संमेलनात आयोजित स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत अनेकदा अव्वल व द्वितीय क्रमाकाचं बक्षीस मिळालं आहे. काव्य रचनेत इतकी तत्परता कुठून असं विचारल्यावर उर्मिलाताई उत्तरतात “यासाठी मी सर्व प्रकारचं वाचन करते मग रोज घरी येणारं वृत्तपत्र असेल किंवा मग पुस्तक, त्या सोबतच एखाद्या व्यक्तीवर, संस्थेबद्दल आणि अन्य मुद्यांबद्दल कविता करताना निरीक्षण आणि अभ्यास हा असतोच” आतापर्यंतच्या त्यांच्या रचनेतून या सर्वच बाबी लक्षात येतात.

“स्त्रीभूण हत्या”, “ज्येष्ठ नागरिक”, “चालू घडामोडी” असा सर्व विषयांवरच, उर्मिला ताईंच्या काव्य रचनांचा आस्वाद त्यांच्याशी बोलताना घेता येतो. त्यामुळे एकप्रकारे साहित्याच्या समृद्धतेसोबतच ज्ञानाची आणि प्रबोधनाचा आनंद घेता येतो.

उर्मिला भूतकर यांच्या साहित्य आणि सामाजिक योगदानासाठी ठाणे महानगरपालिकेचा प्रतिष्ठित असा “ठाणे भूषण” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित ही करण्यात आलं आहे, त्यासोबतच व्यास रत्न, महापौर पुरस्कार, लंडनच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे ही मानपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे.

अनेक पुरस्कार, सन्मान यासोबतच आत्तापर्यंत उर्मिला भूतकरांच्या कार्याची दखल देशातील व समाजातल्या मान्यवरांनी ही घेतली असून यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती मुकेश अंबानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायिका आशा भोसले यांच्या गौरवपर पशस्तीपत्रांचा समावेश आहे.

आज वयाची सत्तरी पार करुन सुद्धा उर्मिला भूतकर आपल्या आवडत्या छंदात कायम मग्न असतात; महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ही त्यांच्या काव्याचे प्रयोग झाले आहेत आणि होत असतात. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ तसंच विविध संस्थाच्या माध्यमातनं त्या अनेक पदांवर सल्लागार व अध्यक्षा म्हणून ही कार्यरत आहेत.

काव्यात सहज-सोपी, आणि तत्परता, त्यामुळेच कवितेतून आनंद देणार्‍या उर्मिला भूतकरांच्या बुद्धीजीवनातही साहित्याचा अनमोल अलंकार “उर्मी” दायक वाटतो.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..