नवीन लेखन...

कहाणी वसुंधरादेवीची.

।। श्री पृथ्वीमाता प्रसन्न श्री वसुंधरादेवी प्रसन्न ।।आपली पृथ्वी म्हणजे सर्व प्राणीमात्रांचे घरच आहे.ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आणि स्वच्छच राहू द्या.शुक्रवार, 22 अेप्रिल 2011, 42 वा वसुंधरा दिवसअेका वर्षी, 22 अेप्रिलच्या वसुंधरा दिनाच्या भल्या पहाटे, 1000 बायामाणसांच्या स्वप्नात पृथ्वीमाता वसुंधरादेवी आली. चेहरा निस्तेज, काळवंडलेला, केस

विस्कटलेले, डोळे खोल गेलेल, हातपाय बारीक हडकुळे झालेले, वस्त्रे फाटलेली अशी तिची दयनीय अवस्था होती. तिच्या आसपास मरतुकडे प्राणी आणि माणसं भुकेनं कलकलाट करीत होती. त्यांचीही अवस्था पृथ्वीमातेसारखीच भयानक होती.त्या 1000 व्यक्तींनी वसुंधरादेवीला प्रणाम केला आणि विचारलं, ”माते तुझी अशी अवस्था कशामुळं झाली?”वसुंधरादेवी म्हणाली ”भक्तांनो माझ्या या अवस्थेला तुम्ही आणि तुमच्या सारखेच या जगातले सारेच जबाबदार आहात. जर, ताबडतोब तुम्ही काही अुपाययोजना केली नाही तर तुमचा सर्वनाश अटळ आहे. माझ्या सर्वांगावर तुम्ही घाण करून ठेवली आहे. नद्या, नाले, तलाव, सरोवरं, समुद्र यांतील पाणी तुम्ही प्रदूषित केलं आहे. वातावरणात विषारी वायू सोडले आहेत. अन्नात भेसळ करताहात, भ्रष्टाचारी झाला आहात, स्वार्थापायी आंधळे झाला आहात, अेकमेकांशी भांडता, लढाया करता, अेकमेकांची संपत्ती लुबाडता, न्याय, नीती, सदाचरण यांचा तुम्हाला विसर पडला आहे. पालनपोषण करता येणार नाही अतक्या मुलांना तुम्ही जन्माला घालीत आहात. मी तर तुमच्यावर कोपलेच आहे, पण तुम्ही स्वत:च तुमचा विनाशकाल ओढवून घेतला आहे, तुमचा विनाशकाल आता जव
आला आहे. अविचाराचे कटू परिणाम भोगण्यास सज्ज व्हा.’सर्वांना पृथ्वीमातेचं हे सांगणं पटलं. त्यांनी तिचे पाय धरले. सर्व तिला शरण जाअून म्हणाले ‘‘या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अेखादं व्रत सांग.’’पृथ्वीमाता म्हणाली, ‘‘भक्तांनो नीट लक्ष देअून अैका, मी जे व्रत तुम्हाला सांगते, त्याला स्वच्छतेचं व्रत म्हणतात. नियोजनाचं, संयमाचं व्रत म्हणतात. जे कोणी पर्यावरण, प्रदूषण, कचरा यांचं व्यवस्थापन करून परिसरात अजिबात घाण होअू देणार नाहीत, सजीवांची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करतील आणि माझ्या म्हणजेच या पृथ्वीवर असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा सुयोग्य वापर करून तिची जपणूक करतील, त्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि जे कोणी हे व्यवहार करण्याची टाळाटाळ करतील, त्यांचं नुकसान होआील, सर्वनाश होआील’ आणि पृथ्वीमाता अंतर्धान पावली, अदृष्य झाली.ती १००० माणसं, जाग आल्यावर, आपण होअून झपाटल्यासारखी कामाला लागली. त्यांनी आसमंतातला सर्व कचरा, घाण साफ केली. रोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची नीट तर्‍हेनं विल्हेवाट लावण्याची सवय त्यांनी लावून घेतली आणि कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचा कोणत्या ना कोणत्या कामासाठी योग्य तर्‍हेनं ते वापर करू लागले.जे लोक नद्या, तलाव, समुद्र वगैरेत घाण, सांडपाणी सोडायचे त्यांनी तसं करणं बंद केलं. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा ते पुनर्वापर करू लागले. आवश्यक असेल तेव्हढ्याच नैसर्गिक संपत्तीचा वापर करू लागले. आपल्या वागण्यामुळं दुसर्‍याला त्रास होणार नाही अशा रितीनं वागू लागले. त्यामुळं सर्वांचं राहणीमान अुंचावलं, आयुर्मान वाढलं, त्यांना आरोग्य लाभलं, कुटुंबातील माणसांची संख्या मर्यादित ठेवल्यामुळं सर्वांना स्वच्छ हवापाणी, सकस व पोटभर अन्न, भक्कम सुखदायक निवारा, मनःस्वास्थ्य अुत्तम राहील असं शि
्ष आणि आपल्या कुटुंबाचं नीट पालनपोषण होआील अशी आर्थिक प्राप्ती होअू लागली.पुढच्या वर्षीच्या २२ अेप्रिलच्या भल्या पहाटे, पृथ्वीमाता जेव्हा पुन्हा त्यंाच्या स्वप्नात आली तेव्हा ती अतिशय सुंदर, सुहास्यवदना, सुदृढ दिसली. प्रसन्न होअून ती म्हणाली, ’भक्त हो मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्हा सर्वांना दीर्घायुरारोग्य लाभेल. तुमच्या कुटुंबातील बायकामाणसांनाही दीर्घायुरारोग्य लाभेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.आता तुमच्या गरजा पूर्ण भागतील. तुमच्या जीवनात चिंता राहणार नाही. तुमच्या कुटुंबातील मुलामुलींचा अभ्यास चांगला होआील. ती अुत्तमरितीने परीक्षा पास होतील. कुणालाही आजारपण येणार नाही. डॉक्टरचं बिल खूपच कमी येआील. पैसा वाचेल, वेळ वाचेल, श्रम वाचतील, चिंता, काळज्या कमी होतील, मनःशांती लाभेल. आता तुम्ही या व्रताचा तुमचा अनुभव अतरांना सांगा. तुम्हाला झालेल्या फायद्याचा लाभ अितरांनाही मिळू द्या.स्वतः कृती करीत रहा म्हणजे त्यांनाही पटेल आणि या आचरणाचा महिमा कळेल. हळूहळू त्यांच्यात सुधारणा होतील आणि तेही त्यानुसार वागू लागतील. आणि हा, सजीवांची वस्ती असलेला पृथ्वीनामक तुमचा हा, विश्वातील अेकमेव माहित असलेला ग्रह पूर्वीसारखा हराभरा होआील व त्यावर सर्व प्राणीमात्र सुखानं जगू शकतील. हे व्रत मनोभावे करीत राहिलात तर विनाश कायमचा टळेल. अन्न, प्राणवायू, पाणी आणि सूर्यप्रकाश या त्यांच्या मूलभूत गरजा सतत पूर्ण होतील. तथास्तू.’वसुंधरादेवी अंतर्धान पावली. १००० भक्तांना जाग आली. त्यांनी वसुंधरामातेच्या आशीर्वादानुसार सर्व थरातील लोकवस्त्यात काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्यात अमाप अुत्साह संचारला.बेपर्वा कारखानदारगावाच्या औद्योगिक परिसरात अनेक कारखाने होते. भरपूर नफा कमाविणं हाच त्यांचा धंदा होता. अनेक
का रखान्यातील काळपट पाणी अेका नाल्यात सोडलं होतं. तसेच कारखान्याच्या पाण्यामधून विषारी रसायनांच्या वाफा निघत असत आणि पाण्याला दुर्गंधी येत असे. त्यामधून निघणार्‍या विषारी रसायनांच्या वाफांमुळं आसपासच्या वस्तीतल्या लोकांना सतत कफ, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. क्षय, दमा, मिरगी असल्या रोगांनी अनेक लोक पछाडले होते. औषधपाणी होआीना, मृत्यूच त्यांना या रोगापासून मुक्त करीत असे.वसुंधरा देवीच्या अेका भक्तानं अेक पत्रक आसपासच्या लोकांना वाचायला दिलं, ते पत्रक वाचून आसपासचे लोक संघटीत झाले. त्यांनी सरकारकडे तक्रारी केल्या. जनता आणि कामगार यांनी कारखान्यांच्या फाटकाजवळ सभा घेतल्या. किती धोकादायक परिस्थितीत कामगार काम करीत आहेत आणि आसपासचे लोक कसे खडतर धोकादायक जीवन जगत आहेत याची जाणीव करून दिली. सांडपाणी शुद्ध केल्याशिवाय आणि रसायनांच्या वाफा निघणं बंद केल्याशिवाय कामगारांना कारखान्यांत जाण्याला बंदी केली. कामगारही त्यात स्वखुशीने सामील झाले. कारखानदार वठणीवर आले. त्यांनी योग्य ते

अुपाय योजिले. नाल्याचं पाणी स्वच्छ झालं. पाण्याची दुर्गंधी गेली, वायुप्रदूषण गेलं वस्तीतल्या लोकांचं आरोग्य सुधारलं. कफ खोकला, दमा, मिरगी हे राक्षसी छळवादी रोग नाहीसे झाले डोकेदुखी थांबली. त्यांना अेकदम प्रसन्न वाटायला लागलं. ते सर्व वसुंधरा देवीचे भक्त झाले.झोपडपट्टीतला कचरासुर आणि त्याची बहीण घाणींबाअेका झोपडपट्टीत अुघडी गटारं होती. लोकं त्यात कचरा, पॉलिथिन बॅगा, नारळपाणी पिअून झालेली रिकामी शहाळी वगैरे टाकीत. त्यामुळं पाणी तुंबलं होतं. त्यातच झोपडपट्टीतीली लहान मुलं शौचमूत्रादी विधी करीत. लोकं पान, तंबाखू खाअून जिकडे तिकडे पचापच थुंकीत. त्यामुळं माशा, डास, किडे, अुंदीर खूप झाले. दुर्गन्धीमुळं जेवण जाआीना, झोप येआीना, मुलंाच
अ ्यास नीट होआीना, खूप मुलं नापास व्हायची.या झोपडपट्टीजवळच महानगरपालिकेचं कचराकुंडदेखील होतं. झाडूवाले, आसपासच्या बिल्डिगामधील लोकांच्या घरातील सर्व ओला आणि कोरडा कचरा तेथे आणून टाकीत. म्युनिसिपालिटीचे सफाआी कामगार थोडाच कचरा घेअून जात, बाकीचा तेथेच पडू देत. कधीकधी तर दोनदोन दिवस कचरा अुचललाही जात नसे. कुत्री, गायी, कावळे, अुंदीर आणि कचरावेची बाया सतत तो कचरा अुचकटीत असत. त्याची दुर्गंधी असह्य होत असे. माशा, डास, यांचा त्रास आणि मलेरिया, हगवण, फ्लू, स्वाआीन फ्ल्यू, डेंग्यू यांची सतत लागण होत असे.पृथ्वीमातेच्या अेका भक्तानं झोपडपट्टीत काह पत्रकं वाटली. ती वाचून वस्तीतल्या लोकांनी मोठी सभा घेतली. स्वच्छतेचं महत्त्व त्यांना पटवलं आणि ते लोकांना पटलंही. ताबडतोब वर्गणी जमवून त्यांनी काँक्रीटचे मोठाले पाआीप आणले. सर्व गटारं भूमिगत केली. अख्ख्या वस्तीत साफसफाआी केली. पक्के संडास बांधून घेतले. पाण्याचा आवश्यक तेव्हढाच वापर केला, डबकी बुजविली.महानगरपालिकेचं कचराकुंड दत्तक घेतलं. कचरा फेकणारांना शिस्त लावली. महानगरपालिकेत तक्रारी करून, कचराकुंडावर रोज जंतुनाशकांची फवारणी होअू लागली. सफाआी कामगार नीट कामं करू लागले.वस्तीचा कायापालट झाला. मुलांचा अभ्यास नीट होअू लागला. १० वी आणि १२ वीच्या १५-२० मुलांना चांगले मार्क पडले. १० वीला ५ आणि १२ वीला ३ मुलं पहिल्याच वर्षी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. त्यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क पडले आणि चेतना नावाची मुलगी १० वीला बोर्डात पंचविसावी आली.कचरा रोजच्या रोज साफ होअू लागला. घाण गेली, दुर्गंधी गेली, डोकेदुखी गेली, डास कमी झाले, अुंदीर-किडे कमी झाले. फ्लू, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, काविळ, हगवण, कॉलरा, खरूज हे रोग खूपच कमी झाले. चिडचिड कमी झाली, भांडणं कमी झाली, मारामार्‍या कमी झाल्या, ल
ोक ांमध्ये तरतरी आली. अुत्साह संचारला, काम करावेसं वाटू लागलं. झोपडपट्टी जिवंत झाली, तिच्यात प्राण आले.पण बाप्ये लोकांची दारू पिण्याची सवय मात्र सुटेना. विडी-तंबाखूची सवय सुटेना. त्यांच्या बायका, मुली, बहीणी, आसपासच्या पांढरपेशांच्या घरी धुणीभांडी करून, झाडूपट्टा मारून कमाआी करीत. झोपडपट्टीतले बाप्ये लोक, आपल्या बायकांना किंवा मुलींना, भाअू आपल्या बहीणींना, मारझोड करून त्यांचा पैसा काढून घेत आणि दारू ढोशीत असत. ही सवयही काही केल्या सुटेना.अितके दिवस तिकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ मिळेना. कारण, आजारपण, डोकेदुखी, भांडणं यामध्ये सगळा वेळ जायचा. पण आता झोपडपट्टीचा कायापालट झाला तशी दारू, विडी, तंबाखुची सवय वाढली. आता ती कमी करण्याचे अुपाय वस्तीतले म्होरके शोधायला लागले. बायकाही संघटीत झाल्या. दारू प्यायलेला माणूस बायकोला मारू लागला की, त्याची समज आलेली मुलेही त्याला लाथा-बुक्क्यांनी ठोकू लागली. दारू पिअून, आआीला मारणार्‍या बापाला अशी शिक्षा देअू लागली. शेजारच्या बायकाही अेकत्र मिळून त्या माणसाला बदडू लागल्या.

दारूच्या गुत्त्यावाल्यांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यांनाही काठ्या-लाठ्या आणि लाथा-बुक्क्यांचा प्रसाद देअू लागल्या. पाच-पन्नास बायका अेकदम दारूच्या गुत्त्यात शिरून, दारूच्या भरलेल्या बाटल्या फोडू लागल्या. गुत्तेवाले पळून जाअू लागले. गुत्ते बंद होअू लागले. पुढल्या वर्षीपर्यंत चांगले परिणाम दिसतील याची लोकांना खात्री वाटली.आता झोपडपट्टीत वसुंधरादेवीचं, पृथ्वीमातेचं मंदीर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करणं सुरू झालं आहे. अख्खी झोपडपट्टी पृथ्वीमातेची भक्त झाली आहे.वनसंपत्तीची तस्करीअेका डोंगराळ भागातील अेक आदिवासी जमात जंगलातील झाडं तोडून लाकडं विकायचा धंदा करी. अमारतीसाठी लाकडं, फर्निचरसाठी लाकडं, जळणासाठी लाकडं, कोळसा तयार करण्यासाठी लाकडं, स्मशानात माणसांची प्रेतं जाळण्यासाठीपण लाकडंच. हे सर्व लाकूड ती जमात सगळ्यांना पुरवायची. अेका माणसाचं प्रेतं जाळण्यासाठी म्हणे दोन झाडांची लाकडं लागतात. साग, चंदन, निलगिरी, अशोक यासारख्या लाकडांची तस्करी व्हायची. झाडांनी, समृद्ध असलेलं ते जंगल आता अगदी ओसाड झालं.जंगलातील दुसरी जमात तर वन्यप्राणीच मारून त्यांचे दात, नखं, चरबी, कातडी, शिंगं आणि मांस विकून आपला चरितार्थ चालवी. या प्राणीसंपत्तीची तस्करी जोरात चालायची. आता त्या जंगलात फक्त पाळलेले प्राणीच, तेही अगदी थोडेच शिल्लक राहिले.जंगलातील पाणवठ्यावर पूर्वी दूरदूरच्या प्रदेशातून पक्षी येत. पण आलेल्यांपैकी अेकही पक्षी परत गेला नाही. सर्व पक्षी मारून त्या लोकांनी फस्त केले. तलावांचं पाणी टँकरनं गावात नेणं सुरू केलं. पाणी विकून कंत्राटदार खूप पैसे मिळवू लागले. तलावांचं पाणी आटत चाललं, कमीकमी होअू लागलं. पाण्यात घाण साठू लागली. आता पाणवठ्यावर, दूरच्या देशातला अेकही पक्षी तेथे येत नाही.

जंगलातील संपत्ती संपली म्हणून धंदा नाही. धंदा नाही म्हणून पैसा नाही आणि पैसा नाही म्हणून खायला अन्न विकत घेता येत नाही. म्हणूनच त्यांच्यावार कुपोषणाची आणि अुपोषणाची परिस्थिती आली आहे. आता त्या जंगलातील लोकं कुपोषणामुळं मरत आहेत.वसुंधरादेवीचे भक्त त्या जंगलात गेले. त्या वन्यजमातींची चूक त्यांना पटवून दिली. आता त्या जंगलातली वृक्षतोड थांबली, तस्करी थांबली. दरवर्षी लाखो नवे वृक्ष, ज्या वृक्षांना फळं येतील असे वृक्ष लावले जातात. झाड मुळापासून कधीही तोडलं जात नाही. फक्त जास्तीच्या वाढलेल्या फांद्याच तोडल्या जातात, तेव्हढ्या पुढील वर्षांपर्यंत परत वाढतात. याला वृक्षपीक काढणं असं ते म्हणू लागले आहेत. नैसर्गिकरित्या वाळलेली झाडंच तोडली जातात आणि त्यांच्या जागी ताबडतोब दोन रोपे लावली जातात, जगविली जातात.वन्यप्राणी आता कुणीही मारत नाहीत. त्यांची हौसेखातर कुणीही शिकार करीत नाहीत. नैसर्गिकरित्या मेलेल्या किंवा मांसाहारी श्वापदानं मारलेल्या प्राण्यांचीच शिंगं, दात, हाडं वगैरेंचा व्यापार करतात. कुक्कुटपालन, दुधदुभती जनावरं पाळणं, मधमाशा पाळणं वगैरेसारखे अुद्योग करतात.आता ते जंगल म्हणजे प्राण्याप्राण्यांच अभयारण्य झालं आहे. पक्ष्यांचं अभयारण्य झालं आहे. नारळ, सुपारी, चिकू, आंबा, काजू, चिंचा, कोकम, फणस, करंवदं, जांभळं अशा तर्‍हेची फळझाडं लावली जातात. डोंगर हिरवे झाले आहेत. जंगल हिरवं झालं आहे.डिंक, राळ, तेलबिया वगैरे जंगलसंपत्ती भरपूर मिळते आहे. आदिवासींना भरपूर रोजी रोटी मिळते आहे. अुपोषण, कुपोषण कमी झालं आहे. लंगोट्या जाअून सदरेधोतरं आली आहेत. स्त्रिया अुघड्या राहत नाहीत, साडीचोळी घालतात. त्यांची मुलं आंगणवाड्यात शिकतात.आता दरवर्षी म्हणजे २२ अेप्रिलला किवा गुढीपाडव्याला साजरा केल्या जाणार्‍या वसुंधरा दिनाच्या सकाळी, वस
ुंधरादेवी सर्वांच्या स्वप्नात येते त्यावेळी तिच्या चेहर्‍यावर प्रसन्नता असते तेज असते. प्रकृती धडधाकट, निकोप, निरोगी भासते. वसुंधरादेवीचे सात्विक, सोज्वळ, विलोभनीय सौंदर्य पाहून सर्व पृथ्वीवासीयांना आनंद होतो.आता पृथ्वीमाता वसुंधरादेवीच्या भक्तांनी आणि जनतेनं गावागावात वसुंधरादेवीची मंदिरं बांधली आहेत. भाविक लोक रोज तिचं दर्शन घेतात आणि आजुबाजूला घाण होणार नाही अशा तर्‍हेनं वागतात.२२ अेप्रिलला वसुंधरा दिन आणि ५ जूनला पर्यावरण दिन धुमधडाक्यात साजरा करतात. तुम्ही आम्ही सर्वांनी घेतलेलं हे वसुंधरादेवीचं व्रत असंच चालू राहो आणि वसुंधरादेवी म्हणजेच आपली पृथ्वीमाता सदा प्रसन्न राहो अशी वसुंधरादेवीच्या चरणी प्रार्थना.

ही, तिसर्‍या सहस्त्रकातील, अेकविसाव्या शतकातील, अनेक समस्यांना योग्य अुत्तरं आणि योग्य अुपाय शोधून काढण्याची आणि ते प्रत्यक्ष आचरणांत आणण्याची कहाणी सुफळ संपूर्ण.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..