नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू.

धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा एसेमेस त्वरीत फाॅरवर्ड होतो. त्या पदार्थाच्या स्वागतासाठी आतमधे तयारी सुरू होऊ लागते. असलेल्या बत्तीशी ने तो बत्तीस वेळा सावकाश चावला की त्यात लाळ चांगली मिसळली जाते. अगदी बत्तीस वेळा असं काही मोजत बसत नाही कुणी पण, त्याचा गिळण्याएवढा गिळगिळीत गोळा तयार झाला की तो अन्ननलिकेत जीभेने ढकलला जातो. तेव्हा श्वासनलिका एका पडद्याने पूर्णपणे बंद होते. अन्नाचा एकही थेंब त्या टाईट बसलेल्या झाकणातून श्वासनलिकेत लिकेज होत नाही.

या पडद्याला कुठेही थ्रेड नाही, कुठेही फेवीकाॅल नाही, कुठेही कडीकुलुप नाही, पण काही सेकंदामधे पूर्ण बंद, तर काही सेकंदात पूर्ण उघडतो देखील !
अन्न कसे गिळावे, पडदा कसा बंद करावा, याचे कोणीही वर्कशाॅप घेतलेले नाही, कोणीही ट्रेनिंग दिलेले नाही, तरी हे काम जन्माला आल्यापासून अव्याहतपणे सुरू असते. हा एकच पडदा नाही तर असे असंख्य पडदे / व्हाॅल्व्ह, आतबाहेर आपल्याला दिसतात, डोळे, ओठ, मूत्रद्वार, मलद्वार हे बाहेर दिसणारे सगळे अवयव कसे उघडायचे कसे बंद करायचे, हे शिकवूनच त्याने जन्माला घातलंय.

कदाचित आधीच्या जन्मी हे सगळं अनुभवलेलं असतं, ते संस्कार घेऊनच आपला मनुष्य जन्म झालेला असतो. आजच्या भाषेत डिफाॅल्ट प्रोग्राम असा काही पक्का झालेला असतो, की कधीही परत फाॅर्मॅट मारावाच लागत नाही.

शेवटी हे यंत्र बनवणारा कोण आहे ?
तोच, जो आपल्या शरीरात राहून सर्व करवून घेत असतो.
तो
सर्वशक्तीमान !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..