नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौदा

पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात.

ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि वारा जिकडे नेईल तिकडे पळतात. तसेच शरीरात कफ आणि पित्त स्वतः अपंग असतात. वात दोष जसे हलवेल तसे त्यांना आपले काम दाखवता येते.

जेवणानंतर लगेचच कफ दोष वृद्धींगत होतो. (दोष म्हणजे ‘फाॅल्ट’ नव्हे) हा कालावधी साधारणपणे दीड ते दोन तासांचा असतो. त्यानंतर पित्ताचे काम अधिक जोमाने सुरू होते. आणि नंतर वाताचे कार्य अधिक जोरात सुरू होते.

आपल्या नकळत चाललेलं हे पचन पूर्ण होईपर्यंत पोटाकडे जरा जास्ती रक्तपुरवठा होत असतो. वात दोष पोटात फिरल्यामुळे बाकी बाहेरील शरीराच्या ठिकाणी वाताचे कार्य मंदावते.

त्याचा परिणाम म्हणून इतर अवयवांना रक्त थोडे कमी पडते. मेंदू, इंद्रिये यांना सुस्ती येते, आळस भरतो, काम न करता पडून रहावेसे वाटते, झोप आल्यासारखी वाटते. ती येतेच.

आयुर्वेदात काही गृहीतके आहेत, काही संकल्पना आहेत, काही धारणा आहेत, काही प्रत्यक्ष प्रमाण आहेत, या अमूर्तांचे गुण वर्णन केलेले आहे, या गुणांचा तरतम भावाने विचार केला तरी यांचे गुण केव्हाही बदलत नाहीत, हाच खरा अभ्यास, हे खरे शास्त्र, त्रिकालाबाधीत सत्य. आजही वात पित्त कफाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या त्याच गुणांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यांचे गुण अंशानेही बदललेले नाहीत. हे आयुर्वेदाचे अविनाशित्व !

हीच पचन प्रक्रिया प्रत्यक्षरीत्या समजून घ्यायची झाल्यास रसायन शास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजीऑलाॅजी, पॅथाॅलाजी, इ. अनेक पद्धतींनी समजून घेता येईल. त्यासाठी अन्नातील घटकद्रव्यांचा स्वतंत्र विचार, एकमेकांत होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रिया, इ. सर्व समजून घेण्यासाठी, त्या त्या शास्त्रांचा परत स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, तरच ते नीट समजून घेता येईल. यापेक्षा आयुर्वेदात काय सांगितलेले आहे ते समजून घेणे हे अगदी सोपे आहे, असे वाटते.

मायक्रोलेव्हलला आतमधे काय चाललेले आहे हे प्रत्यक्षात पहाण्यापेक्षा, वात पित्त कफाच्या, गुरू मंद आदि वीस गुणांचा अभ्यास करून, अनुमान प्रमाण वापरून, आतील सूक्ष्मातील कार्य समजून घेणे, हे समजायला सोपे नाही का ?
जे सोपे आहे ते अधिक सोप्पे करून सांगितलं तर समजण्याचं काम सोप्पं होतं ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..