नवीन लेखन...

आहाररहस्य १६

जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे.
मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.

ऊष्टे खाण्यात मोठा दोष, जंतु संसर्ग हा आहे. आपण पाणी प्यालो, ग्लास ओठाला लावला.ओठावरची लाळ ग्लासाला लागली, तेच ग्लास मुलाने पाणी पिण्यासाठी वापरले तर ग्लासावरील लाळेतील सूक्ष्म जंतु मुलाच्या पोटात जातील. आणि जर मुलाची प्रतिकारक्षमता कमी असेल तर त्याला त्रास संभवू शकते, असे आजचे विज्ञानपण सांगते.

मुलाच्या ताटातील उष्टे अन्न आईने खाल्ले तरी चालते, कारण आईची प्रतिकारक्षमता मुलापेक्षा जास्त असते. पण आईने जेवलेल्या ताटातील ऊष्टे अन्न, मुलाला त्रास देऊ शकते. आईच्या ताटात मुलाने जेवू नये. आणि सिनेमामधे, कुकरी शो मधे तर केक काय किंवा पिझ्झा काय, एकमेकांच्या तोंडात एकमेकांचे उष्टे भरवणे म्हणजे जंतुना निमंत्रण देणेच आहे.

फिरत फिरत खाण्यामधे किंवा जेवत असलेल्या हातानीच वाढून घेणे, या मधे पण तोच दोष येतो. इकडचा जंतु संसर्ग तिकडे.

अन्नाची नासाडी करणे, नको असेल ते अन्न ताटात वाढून घेऊन ताटात ऊष्टे करून टाकणे, यासारखा मोठा दोष नाही

दोन्ही हातानी खाण्यामधे डावा हात अन्नाला लागतोच. आणि ते असंस्कृत आणि रानटी पण आहे.

त्यामुळे एका ताटात एकाच व्यक्तीने जेवावे. असे भारतीय विचारसरणी सांगते.

हसतखेळत जेवणे हे काही वेळा बरोबर वाटते. मूड चांगला असतो.
हसत ठीक आहे. पण खेळत नको.
पण रडत चिडत नको.
न अति विलंबित, न अति द्रुत. म्हणजे खूप सावकाशपण नको, आणि खूप जलद पण नको.

हसत हसत जेवल्याने वेळ जास्ती जाईल. रडत चिडत त्रागा करत फार लवकर जेवले जाईल., आणि रागाने, बकाबका भसाभसा खाल्ले जाईल, जे चुकीचे असेल.

आपल्याला जेवणातून समाधान मिळाले पाहिजे.
अन्न उडवत उडवत तर कोंबडी पण पोट भरते, सगळ्या चवी एकत्र करून म्हैस पण आंबोण खाते.

वाढलेले ताट आणि संपवलेले ताट ही दोन्ही ताटे फोटो काढण्यासारखीच सुंदर हवीत.
देवाला सुंदरता आवडते ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
16.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..