नवीन लेखन...

आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

ancient-india-map

सध्या व्हाट्सॲपवर आपल्या देशाला India हे संबोधन कसे प्राप्त झाले त्याची निखालस खोटी व कोणताही ऐतिहासीक आधार नसलेली विकृत माहिती देण्यात येत आहे. ती माहिती अशी आहे –
“INDIA –
Independent Nation Decleared In August
असा नामनिर्देश केल्या गेलेल्या हिन्दुस्तानला त्याचा shortform इंग्रजांनी केला INDIA..”

खरी माहिती अशी आहे –

आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत ‘हिन्दुस्थान’ या नांवानेच ओळखला जातो. हिन्दु आणि त्यांचे स्थान म्हणजे हिन्दुस्थान. ही नांवे आपल्याला ‘सिंधु’ नदीवरून मिळाली आहेत हे सर्वानाच माहित आहे. ‘सिंधु’चं हिन्दु, हिन्दी व पुढे इंडीया कसे झाले याला काही भाषाशास्त्रीय कारणं आहेत.

जगातील सर्वात पुरातन व समृद्ध संस्कृतीपैकी एक आपली हिन्दु संस्कृती आहे. जगातील सर्व संस्कृती ह्या नद्यांच्या सुपीक काठांच्या आधाराने फुलल्या. त्याचप्रमाणे आपल्या देशातील संस्कृती ‘सिंधु’ नदीच्या तीरावर वसली, रुजली व समृद्ध झाली. हजारो वर्षांपूर्वी जेंव्हा परकीय लोकांनी खैबर खिंडीतून आपल्या देशावर आक्रमण केले तेंव्हा इथली समृद्ध संस्कृती पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या या संस्कृतीला त्यांनी नांव दिल ‘सिंधू संस्कृती’..!

भाषाशास्त्रानुसार उत्तरेकडील काही भागात काही अक्षरं लिहिण्याची व उच्चारण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ‘र’ चा उच्चार बहुतकरून ‘ल’ असा केला जातो किंवा उलटही होऊ शकते. ‘र’ आणि ‘ल’ अक्षरांच्या उच्चारांत बरंच साम्य आहे. लहान मुलं बोलायला शिकत असताना आपल्या बोबड्या बोलीत अनेकदा ‘र’ चा ‘ल’ करतात. बर्‍याचदा प्रौढांच्या ‘र’चा उच्चारही ‘र’ आणि ‘ल’च्या मध्ये कुठेतरी होतो. ‘य’ आणि ‘ज’ शब्दाचीही अदलाबदली होते. उदा. ‘यतीन’ चा ‘जतीन’ होतो. ‘यजमान’ चा ‘जजमान’ होतो किंवा ‘यादव’चा ‘जाधव’ होतो. तसेच ‘स’ अक्षराने सुरु होणाऱ्या काही शब्दांचा उच्चार ‘ह’ असा करण्याची प्रथा आहे. अगदी रोजचे उदाहरण द्यायचे तर आपल्या मित्रपरिवारात कोणी गुजराती बांधव असतील तर ते ‘साडी’ या शब्दाचा उच्चार ‘हाडी’ असा करताना आढळतील, सकाळी म्हणजे ‘सवारे’ या गुजराती शब्दाचा उच्चार ‘हवारे’ असा करतात. त्याच्याही उत्तरेत ‘श्री’ चा ‘हरी’ होतो. ‘सप्ताह’चा ‘हप्ता’ झाला. याच न्यायाने ‘सिंधू’चा ‘हिन्दू’ झाला व देशाचे नांव ‘हिंदुस्थान’ झालं. हिंदुस्थान हे नाव आपल्या देशाला अशा प्रकारे मिळाले आहे.

ब्रिटीश जेंव्हा आपल्या देशात आले तेंव्हा त्यांनी आपल्याला ‘हिंदी’ लोकांचा देश असे संबोधले. ‘ह’ हा शब्द उच्चारताना तो हलका करून उच्च्रायची ब्रीतीश्न्ची लकब आहे. जसे Hour किंवा Honour हे ‘ह’ ने सुरु होणारे शब्द ‘अवर’ व ‘ऑनर’ असे उच्चारले जातात असा आपला रोजचाच अनुभव आहे. याच प्रकारे ‘हिंदी’ या शब्दाचा उच्चार ते ‘ईंडी Indi’ असा करीत. याला पुढे कधीतरी ‘a’ प्रत्यय लागून ते नाव ‘India” झालं.

‘a’ या अक्षराच्या उच्चाराबद्दल बद्दल माझे वेगळे मत आहे.. या अक्षराच ‘अ’ आणि ‘आ’ असा उच्चार केंव्हा करायचा याला एक नियम आहे जो हल्ली कुठेच शिकवला जात नाही. केवळ ‘‘a’ असल्यास त्याचा उच्चार ‘अ’ असाच करायचा असतो तर ‘आ’ उच्चार करायचा असल्यास तो शब्द ‘ ā ’, म्हणजे ‘a’ अक्षराच्या डोक्यावर ‘हायफन’ द्यायचा असतो. म्हणजे त्या इंग्रजी शब्दाचा देवनागरी उच्चार बरोबर करता येतो. याच पद्धतीने इंग्रजी ‘INDIA’ चा उच्चार ‘इंडिया’ असा होत नसून फक्त ‘ईंडी’ असाच होतो जो देवनागरी ‘हिंदी’चाच अपभ्रंश आहे. ‘इंडिया’ हे आपल्याला देशाचे संबोधन असे तयार झाले आहे.

केवळ चुकीच्या पद्धतीने शिकवले जात असल्याने ‘राम’ चि स्पेलिंग ‘Rama’ अशी लिहिली जाऊन त्याचा ‘रामा’ होतो. वास्तविक हा शब्द ‘Rāma’ असा लिहिणे अपेक्षित आहे जेणेकरून मुलांना समजेल कि ‘र’च्या पुढचा ‘a’ ऱ्हस्व नसून दीर्घ आहे आणि त्याचा उच्चार ‘आ’ असा करायचा आहे व शेवटचा ‘a’ ऱ्हस्व असल्याने त्याचा उच्चार करायचा नाही. ‘महादेव’ हा शब्द इंग्रजीत ‘Mahādev’ असा लिहिल्यास अगदी बरोबर वाचता येतो हे तुमच्याही लक्षात येईल.

खर तर विषय खूप मोठा आहे. थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास व पटल्यास जरूर कळवावे.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

2 Comments on आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..