नवीन लेखन...

अलर्जी म्हणजे काय?

अनेक ऍलर्जीकारक घटक, ते वातावरणात समाविष्ट असतात, जसे, फुलांचे परागकण, धूळ, धूर, त्याचप्रमाणे विविध अन्नघटक, धातू, कीटकदंश, निरनिराळ्या प्रकारची औषधे ही त्वचेची तसेच श्वाचसनलिकेची संवेदनशीलता वाढवू शकतात, तेव्हा असे ऍलर्जीन्स किंवा ऍलर्जीक सूक्ष्मकण आपल्या शरीरातील IGE अँटीबॉडीस‘शी संयोग पावतात, तेव्हा हिस्टॅमिन नावाच्या रसायनाचे रक्तातले प्रमाण वाढते आणि त्याचे पर्यवसान निरनिराळ्या ऍलर्जीक त्रासांमध्ये होते. प्रामुख्याने दिसून येणाऱ्या निरनिराळ्या ऍलर्जीस कोणत्या व त्या कशा प्रकारची लक्षणे निर्माण करतात याविषयी आपण थोडी माहिती.
ऍलर्जीक सर्दी व सायनुसायटीस – ऍलर्जीक विकारांमध्ये सर्वांत जास्त आढळून येणारा हा विकार आहे. सध्याचे वाढते प्रदूषण हेही या विकाराच्या प्रमाणामध्ये भर टाकत आहे. ही ऍलर्जीक सर्दी, हवेतील घटकांमुळे होते. हवेतील धूळ, धूर, परागकण आणि इतर काही सूक्ष्मकण यांच्यामुळे नाकातील पटलाला सूज येते- त्यामुळे नाकातून वारंवार पाणी येणे, साधारणतः 10 ते 20 किंवा कधी कधी जास्तच शिंका येणे, नाक चोंदणे, नाकात व टाळ्याला खाज येणे, डोळ्यालाही खाज येऊन डोळे लाल होणे, नाकातून पाण्याची धार लागणे या प्रकारच्या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. ही लक्षणे विशिष्ट ऋतूत तर काही व्यक्तींमध्ये वर्षभर त्रास देत राहतात. वेळीच या त्रासावर उपाय केले गेले नाहीत, तर या त्रासाचे रूपांतर सायनुसायटीस, नाकातील पॉलिप्स किंवा कानाच्या विकारातही होऊ शकते. या सर्दीला गंभीर व्याधीचे स्वरूप बिलकूल नसूनही सततच्या शिंका, वाहते नाक, डोळ्यांची खाण यामुळे व्यक्तीची कामातली तत्परता, उत्साह खरोखरच कमी होते आणि व्यक्ती संत्रस्त बनते.

ऍलर्जीक दमा बऱ्याच व्यक्ती, या ऍलर्जी सर्दीने त्रस्तत असतात, त्यांच्यामध्ये ऍलर्जीक दम्याचेही प्रमाण अनेक वेळा दिसून येते. ऍलर्जीक सर्दी आणि ऍलर्जिक दमा ते एकमेकांबरोबरच बऱ्याच वेळा आढळून येतात. थोडासा धूर, धूळ, अत्तरांचे सुगंध, फुलांचे गंध या आणि अशा प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः वासातून संपर्क आला, की छाती जड वाटणे, भरून येणे दम लागणे, श्वाशस घ्यायला त्रास होणे, थोडाफार खोकला येणे अशी लक्षणे दिसायला लागतात आणि ही लक्षणे ठराविक ऋतूत जास्त तीव्र होतात.

अर्टिकॅरिआ किंवा अंगावर गांधी उठणे (अंगावर पित्त उठणे)
अनेक प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः खाण्यातून संपर्क आला की अंगावर पुरळ, चट्टे उठणे, मोठ्या गांधी येऊन खाज येणे यालाच वैद्यकीय भाषेत अर्टिकॅरिआ असे म्हटले जाते. अशा प्रकारची त्वचेची तक्रार अंडी, मासे, सागरी खाद्ये, ठराविक भाज्या यांच्या सेवनाशी निगडित असते. कधी कधी काहीच न खाताही पित्त उठू शकते. लक्षणांची सुरवात अंगावर छोटे पूरळ उठण्याने होते. थोड्या वेळाने हे पूरळ मोठे होतात, त्यांचे चट्टे बनतात व खाज येऊ लागते. या चट्ट्यांचे प्रमाण पोटावर, पाठीवर, हातापायांवर मानेवर, कधी कधी चेहऱ्यावरही जास्त असते. त्वचेची ऍलर्जी कशामुळे यावी याला तसा काहीच नियम नाही. कोणाला गवारीच्या भाजीमुळे तर कोणाला कोबीच्या भाजीमुळे पित्त उठते. सालीसकट खाल्ली जाणारी फळेही जंतुनाशक फवारा मारल्यामुळे जर स्वच्छ धुतली गेली नाहीत, तर ऍलर्जीचे चट्टे उठू शकतात.

ऍलर्जीक इसब (अटोपिक दाह किंवा अटोपिक डरमॅटायरीस) ऍलर्जीमुळे होणारा त्वचेचा दाह यालाच वैद्यकीय भाषेत अटोपिक डरमॅटायरीस (Atopic dermatitis) असे म्हटले जाते. बऱ्याच वेळा ऍलर्जीक सर्दी, ऍलर्जीक दमा आणि त्वचेचा ऍलर्जीक दाह हे एकत्रच दिसतात. यांना “ऍलर्जीचा त्रिकोण‘ असेही म्हणतात. ही तक्रार शक्यहतो लहान वयातच सुरू होते. यामध्ये त्वचा रुक्ष व कोरडी बनते. त्वचेला लाली, सून येऊन खाज येते. व कात्रेही पडतात. लहान मुलांमध्ये अंगावर कोठेही तर जसजसे वय वाढेल तसतसे त्वचेचे हे चट्टे गुडघ्याच्या मागे, कोपरावर येत राहतात. ऍलर्जीचा हा प्रकार अत्यंत चिवट आहे. तो आपली उपस्थिती परत परत दाखवतो- वेळप्रसंगी होमिओपॅथिक औषधांच्या मात्रा बदलून त्याला शह देत राहावे लागते.

त्वचेचा संपर्कदाह (contact dermatitis) त्वचेचा जो भाग काही प्रकारच्या ऍलर्जीक घटकांच्या संपर्कात येतो, तो लाल होणे, खाज उठणे, पूरळ येणे यालाच वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्टट डरमॅटायरीस म्हणतात, काही साबणे, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, खोटे दागिने यांच्या वापरानंतर अशा प्रकारचा त्वचेचा दाह सामान्यतः दिसून येतो. हाही ऍलर्जीचाच एक प्रकार आहे.

अशा सर्व ऍलर्जीक व्याधींमध्ये ऍलर्जिन्सचा संपर्क टाळणे हा जरी उपाय असला तरी तो व्यावहारिक खचितच नाही. अशा वेळेला अशा तक्रारींवर ऍटीऍलर्जीक (ऍन्टीहिस्टॅमिनिक्सट- Antihistaminics) औषधे घेऊन ती ऍलर्जी सतत दाबून टाकायचा प्रयत्न करणे याखेरीज यावर उपाय काय असा प्रश्नत पडणे अगदी साहजिकच आहे. या प्रश्नातला होमिओपॅथी अगदी समर्पक उत्तर देऊ शकते. वर नमूद केलेल्या ऍलर्जीक खेरीज ऍलर्जीचे अनेक प्रकार आहेत; परंतु वरील प्रकारच्या ऍलर्जीमध्ये होमिओपॅथी अत्यंत गुणकारी ठरते, असे अनुभवाप्रमाणे दिसून येते. होमिओपॅथीत अतिसंवेदनशील ते वर अनेक परिणामकारक औषधे आहेत जी सर्दी, दमा, त्वचेचा दाह, पित्ताच्या गांधी यासारखी लक्षणे तर कमी करतातच; पण त्वचेची अतिसंवेदनशीलताही मर्यादित करतात. त्यामुळे नेहमी त्रास देणारे वातावरणातले घटक, खाद्यपदार्थ हेसुद्धा तितकेसे त्रासदायक ठरत नाहीत. होमिओपॅथीत ऍलर्जीक दमा, सर्दी यावर ऍलियम सेपा, अर्सिनिक अलव, नक्सयहोमिका ही आणि अशी अनेक गुणकारी औषधे आहेत, तसेच त्वचेच्या दाहावर कोपायव्हा, एपिसमेल, आर्टिकायुरेन्स यासारखे रामबाण उपाय आहेत, जी प्रकृतीसाधर्म्यानुसार, तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य शक्तींमध्ये घेतली तर ऍलर्जीकारक प्रवृत्ती, ऍलर्जीक लक्षणे कमी करतातच याशिवाय प्रतिकारशक्तीही वाढवतात आणि त्या पदार्थाप्रति असणारी अतिसंवेदनशीलताही कमी करतात.

एकतर लक्षात ठेवले पाहिजे, की ऍलर्जी ही मुळात खोलवर रुजलेली, जुनी प्रवृत्ती आहे. कधी कधी तर ती आनुवंशिकही आहे, त्यामुळे पेशंटने दाखवलेला “पेशन्स‘ डॉक्टृरची आपल्या पेशावरची आणि उपचारपद्धतीवरची निष्ण, होमिओपॅथीक शास्त्राची नवीन युगातही पुरून उरणारी व्यापकता या साऱ्यांचा संगम झाला तर वैद्यकशास्त्रातील अनेक अवघड समस्यांची उत्तरे निश्चि तच उलगडत जातील.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२२३०१७३३
संदर्भ. डॉ. अपर्णा पित्रे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on अलर्जी म्हणजे काय?

  1. Same problem i.e.red rashes,asthama- brething trouble i am facing since last 7-8 years.I have taken alopathic,ayurvedic,homeopathic treatment.Still problem of allergy persists.Please suggest some remedy.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..