नवीन लेखन...

अफवाना वाव देऊ नका..

नुकतीच नागोठणे येथील एक पोस्ट सोशल मिडियावर फिरतेय. अजगराने मुलीला गिळले..  अशा शिर्षकाने…..

सोशल मीडियाचा गैरवापर म्हणतो तो हाच. कुठलीही माहिती कुठेही जोडायची आणि वायरल करायची.

रेटिक्युलेट पायथन (जाळिदार अजगर) हा अंदमान निकोबार बेटावर आढ़ळतो .त्याची लांबी 32 फुट एवढी नोंदली आहे. एवढा मोठा अजगर माणसाला इजा पोहचवु शकतो ,पण अजून तरी तशी नोंद भारतात नाही.

सध्या वायरल होत असलेली पोस्ट व त्यातील फोटो ज्यात माणसाचे पाय दिसत आहेत तो एका विषारी सापाचा फोटो एडिट केलाय, अजगराला विषारी सुळे (दात) नसतात.आणि जो गाडिमधे काहीतरी खाऊन आहे तो जाळीदार अजगर आहे. हे फोटो भारतातले नसून ते खुप जूने आहेत.

आपल्या कड़े इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) आढ़ळतो.त्याची लांबी 25 फुट एवढी नोंदली आहे.या अजगराने आता पर्यन्त माणसाला गिळल्याची नोंद नाही. कुत्रा मांजर कोंबड्या शेळ्या मेंढ्या यांच्या मागे इंडियन रॉक पायथन मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना कॉमन आहेत.

कृपा करुन आधीच बदनाम केलेल्या या असहाय जिवाना आणखी बदनाम करू नये यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करू या.

या अशा पोस्ट या जिवाना नामशेष करण्यासाठी पुरेशा असतात. अज्ञान हे आंधळ असतं. आपण भारतीय सत्य जाणुन घेण्या ऐवजी अंधानुकरण करण्यात पुढे आहोत.
— FON फ्रेंड्स ऑफ़ नेचर ,चिरनेर
उरण-रायगड

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..