११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती

हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।

 

जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां

पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां

तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।

 

जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती

फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती

वाजे डंका, अन् आशंका मनिं कांहीं नच उरती ।।

 

मी हतभागी, अंधार जगीं, पुढला ना मार्ग दिसे

वाटेवरती काटे रुतती, दुर्भाग्यभुजंग डंसे

देइ अनंता धरुन हात  आनंदमयी मुक्ती  ।।

– –

– सुभाष स. नाईक

 महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
beed-kankaleshwar-temple-300

ऐतिहासिक शहर बीड

बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी ...
pune-pimpri-chinchwad-manapa

पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर

एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे ...
p-475-ThermalPowerstationBhusawal

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात ...

Loading…

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*