सुदाम्याला ऐश्वर्य

गरिब सुदामा बालमित्र ,   आला हरीच्या भेटीला

बालपणातील मित्रत्वाची,   ओढ येवूनी मनाला….।।

छोटी पिशवी घेवूनी हाती,    पोहे घेतले त्यात

फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत….।।

काय दिले वहीनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने

झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने….।।

बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते

मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते….।।

समोर असता सुदामा,  काही न दिले त्याते

द्विधा होऊनी मन:स्थिती,  परत पाठवी रिक्त हस्ते…।।

देवूनी ऐश्वर्याच्या राशी,   सुदाम्याच्या माघारी

मित्रत्वाच्या प्रेमभावाची,   भेट देई श्री हरी….।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-475-ThermalPowerstationBhusawal

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात ...
p-558-ichalkaranji-rajwada

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले ...
paithani-sarees-2-300

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या ...

Loading…

डॉ. भगवान नागापूरकर यांच्याविषयी... 1005 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*