सहज एकदा फेरफटका मारताना

सहज एकदा फेरफटका मारताना
वाटेत  “राग” भेटला
मला पाहून म्हणाला…
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच
“संयम” पाळलाय घरात
आणि “माया” पण माहेरपणाला
आली आहे..

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!

पुढे बाजारात  “चिडचिड”
उभी दिसली गर्दीत, खरं तर
ही माझी बालमैत्रीण पण पुढे
कॉलेजात  “अक्कल” नावाचा
मित्र मिळाला आणि हिच्याशी
संपर्क तुटला..!!

आज मला पाहून म्हणाली अरे
“कटकट” आणि  “वैताग”
ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा..
हल्ली मी “भक्ती” बरोबर
सख्य केलय त्यामुळे
“आनंदा”त आहे अगदी..!!

पुढे जवळच्याच बागेत
“कंटाळा” झोपा काढताना दिसला
माझं अन त्याच हाडवैर….
अगदी 36 चा आकडा म्हणाना….
त्यामुळे मला साधी ओळख
दाखवायचाही त्याने चक्क  “आळस” केला..!!
मीही मग मुद्दाम “गडबडी” कडे
लिफ्ट मागितली आणि
तिथून सटकलो..!!

पुढे एका वळणावर “दुःख”
भेटलं, मला पाहताच म्हणालं
“अरे ये, तुझीच वाट पहात होतो”

मी म्हणालो, “अरे वाट पहात
होतास कि वाट लावायच्या
तयारीत होतास? आणि माझ्या
बायकोपेक्षा तूच जास्त वाट
बघतोस कि रे माझी
“तसं “लाजून” ते म्हणालं,
“अरे मी पाचवीलाच पडलो
(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.
कस काय सर्व ? घरचे मजेत ना?”

मी म्हणालो, “छान” चाललय सगळं…
“श्रद्धा” आणि “विश्वास”
असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात
त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको “काळजी” करूस.
हे ऐकल्यावर “ओशाळलं”
आणि निघून गेलं..!!

थोडं पुढे गेलो तोच
“सुख” लांब उभं दिसलं
तिथूनच मला खुणावत होतं,
धावत ये नाहीतर मी चाललो
मला उशीर होतोय..

मी म्हणालो, “अरे कळायला
लागल्यापासून तुझ्याच तर मागे
धावतोय उर फुटे पर्यंत,
आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट
झालीय… एकदा दोनदा भेटलास
पण ‘दुःख’ आणि ‘तू’ साटलोट
करून मला एकटं पाडलत..
दर वेळी. आता तूच काय तुझी
“अपेक्षा” पण नकोय मला.
मी शोधलीय माझी “शांती”
आणि घराच्यानीं माझ नावच
“समाधान” ठेवलंय..!!About Guest Author 504 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…