वाढती लोकसंख्या एक दुष्टचक्र

सध्याच्या धकाधकीच्या दैनंदिन जिवनात आज आपल्याला सर्वच स्तरावर स्पर्धांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कुटुंब होरपळून निघत आहे आणि त्याचे दुषपरिणाम खूप गंभीर होताना दिसत आहेत.

एक साधं उदाहरण बघूः दहावी बारावीचा निकाल लागला की आपण कॉलेजमध्ये प्रवेश मिळवीताना बघतो किती स्पर्धा आहे. तसेच एखाद्या स्पर्धा

परिक्षांना किंवा नोकरीच्या निमित्ताने एखादी जागा भरावयाची असल्यास कित्येक लाख अर्ज येतात. हे प्रमाण व्यस्त असल्याने तेथे गैरव्यवहार होताना दिसतात. लाच देऊन व घेऊन कामे करण्याची सवय वाढते. हाच नियम सर्व ठिकाणी लागू होतो. म्हणजेच मागणी अधिक व पुरवठा कमी. हाच मोठा अडथळा आपल्या समाज व्यवस्थेत आला आहे आणि आज सर्व ठिकाणी व स्तरावर पोखरत आहे. याचे दुषपरिणाम बर्‍याच कुटुंब व्यवस्थेवर पडत आहेत. घरात कमी श्रमात पैसा आला किंवा खिशात खुळखूळायला लागला की नकोती व्यसने तसेच स्वतःसाठी व कुटुंबासाठी नसत्या गरजा वाढायला लागतात व त्या पूर्ण करण्यासाठी अजून भ्रष्टाचार. याने एक भ्रष्टवर्तुळ (Vicious Circle) व्यवस्था उदयास येते. माणूस अमार्याद होतो आणि त्याच्या हातून नकोत्या गोष्टी घडायला लागतात. त्या अशा :

“अल्पवयीन मुलीवर बलात्कार” “विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये रॅगींग” “डॉक्टराने आत्महत्या केली” “दहशदवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवीला” “फसवाफसवी” आणि या पेक्षा भयंकर बातम्या आज आपल्या कानावर पडतात किंवा वृत्तपत्रांतून वाचावयास मिळतात. आता आपल्याला याची सवयच झाली आहे म्हणून आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

आपल्या देशात काही कोटी नागरीकांना रोजचे एकवेळचे अन्न सुद्धा मिळत नाही. काही बालकं तरूण व वृद्ध उपाशी पोटी झोपत आहेत. देशातील कित्येक लाख नागरीकांना अंग व्यवस्थीत झाकण्यासाठी वस्त्रही नेसायला मिळत नाही. देशातील कित्येक लाख नागरिकांना त्यांची स्वतःची हक्काची जागाही नाही. रोज स्वच्छ व चांगले पाणी पिण्यास न मिळाल्याने नागरीकांच्या तोंडाचा चंबू होताना दिसतो. खेडेगावात तर पिण्याचे पाणी कित्येक कि.मी. पायी जाऊन आणावे लागते.

का अशी परिस्थिती निर्माण झाली? याला आपण कारणीभूत आहोत? का देशातील कायदे व धोरणं? काय असं झालं ज्याने या सगळयाला आपण मेटाकुटीला येऊन तोंड देत असतो?

मानवानी या वसुंधरेवर अनन्वीत आत्याचार केले आहेत करत आहे व करत राहाणार आहे. मानवानी मर्यादांचे उल्लंघन केले आणि निसर्गही अमर्याद झाला. तपमानात वाढ होऊन निसर्गाचे चक्र बदलले. वेळी अवेळी पाऊस येऊन पीकांचे नुकसान झाले. मानव जसा प्रगत होत गेला तशी त्याची हाव वाढत गेली. मर्यादा सुटल्या आणि आजची परीस्थिती निर्माण झाली. या सर्वांच्या मुळाशी बेजबाबदार वाढणारी लोकसंख्या व त्या अनुशंगाने येणारी बरीच कारणे आहेत. कारण या वाढत्या लोकसंखेच्या विळख्यात माणूस अडकत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आज सर्वच देशांना भेडसावत आहे. त्यात आपल्या सारख्या प्रगती करणार्‍या देशांमध्ये तर याने रूद्र रूप धारण केले आहे. तसेच काही गंभिर प्रश्न निर्माण केले आहेत.

आपल्या देशाची धोरणं ही याला काही प्रमाणत जबाबदार आहेत. आपल्या आजुबाजूच्या देशांतून होणारी घुसखोरी व परदेशी नागरीक तसेच विद्यार्थी ज्यांचा व्हिसा संपला असताना सुद्धा राहात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम ज्याने आपल्या देशातील नागरीकांच्या मुलभूत गरजा भागवणे सरकारला दुरापास्त झाले आहे. तसेच त्या अनुशंगाने येणार्‍या समस्यांतही दिवसागणीक भर पडत चालली आहे.

यात बदल घडवून आणायचा असेल तर प्रथम लोकसंख्येला आळा घालावा लागेल. समान नागरी कायदा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. देशातील सद्य कायदे व धोरणांत अमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल. शासन यंत्रणेतील व राजकारणातील भ्रष्टाचार व काळाबाजार पूर्ण बंद व्हावाच लागेल. त्यासाठी सक्षम यंत्रणा लागेल. यासाठी शासनयंत्रणेत व राजकारणात सकारात्मक इच्छाशक्तिचा स्त्रोत वाढावा लागेल. यासाठी प्रथम देशाच्या सुरक्षेची प्रेमाची व देशाप्रती आदराची भावना व कृती वाढवावी लागेल. स्वतःचा व नातेवाईकांचा स्वार्थ बाजूला ठेऊन सामान्य जनतेच्या मुलभूत गरजा भागवीण्याच्या कृतीची अम्मलबजावणी झाली व लाचखोरी संपूर्ण बंद झाली तरच यात काही अंशी बदल घडण्यास सुरवात होईल. कारण हा रोग खूप चिवट व संसर्गजन्य तसेच जखम ओली व खोलवर झाली असल्याने त्यावरील औषध जालीम व खूप दिवस घेत राहील्यासच किंवा इंजेक्शने टोचत राहिल्यास रोग आटोक्यात आणत येईल. अन्यथा “राम” जाने.

जगदीश पटवर्धनवझिरा बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धनमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 222 लेख
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*