वाट पंढरिची पावन ही

पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई
वाट पंढरिची पावन ही  ।।

चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे
दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे
भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं  ।।

सोडुन आलो मागुती  घर, कुटुंबां जरी
चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी
ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।।

प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास
पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास
रूपडें दिसेल कधि तें, अती मनां घाई ।।

नेते ही वाट सर्वां विठुरायाच्या पदीं
पापांचें करेल क्षालन चंद्रभागा नदी
शुचिर्भूत अंतर्बाह्यच करते सरिता ही  ।।

याचि देहिं याचि डोळा पाहुनिया पंढरी
नाद अनाहत हृदयीं अन् अमृतवर्षा शिरीं
नेइल वैकुंठीं विठ्ठल, संशय ना कांहीं  ।।

सुभाष स. नाईक
Subhash S. Naik



महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*