रुसू नको गऽ ताई (बालकाव्य)

( रक्षाबंधनाच्या निमित्तानें : बालकाव्य )

रुसू नको गऽ ताई, फुगवुन् गाल तुझे तू नको बसू

फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।

 

नको रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली

चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी

राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।।

फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।

 

फुगवलेस तू गाल, तरी अंदाज मला आला इतका

केवळ आहे ढोंग सर्व हे, राग तुझा आहे लटका

आता ताई, खोटे खोटे डोळे अपुले नको पुसू ।।

फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।

 

रुसव्याचा हा फोड फुगा, सांगतो जोडुनी हात तुला

नाहींतर अस्साच फुगा मग फुगवावा लागेल मला

खुद्कन ओठांमधुनी आता पहा निसटले कसे हसू ।।

फुगा फोडुनी रुसव्याचा हा ओठी आले गोड हसू  ।।

– – –

—  सुभाष स. नाईक   
Subhash S. Naik

 महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-495-shirishkumar-smarak

शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले  नंदुरबार हे खानदेशातील एक ...
tansa-lake-g-300

मुंबईची तहान भागविणारा तानसा तलाव

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील ...
Raigad-Mahaad-chavdar-tale-dr-ambedkar-statue-300

चवदार तळे

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*