मनुष्य, प्राणी आणि बुद्धिमत्ता

वीस घोडेस्वार शिकारी वीस शिकारी कुत्र्यांना सोबत घेऊन एका कोल्ह्याचा पाठलाग करत होते. आपल्या मागावर असणाऱ्या या टोळधाडीकडे बघून कोल्ह्याने मनातल्या मनात म्हटलं, ” निसंशयपणे थोड्याच वेळात हे मला मारून टाकतील ; पण हे लोक किती क्षुद्र आणि मूर्ख आहेत ! वीस कोल्हे वीस गाढवावर बसून वीस लांडग्यांना सोबत घेऊन एका माणसाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करणं कधीच योग्य समजणार नाहीत ! अन तरीही हे स्वतःला पराक्रमी जीव म्हणवतात !”

मनुष्य हाच पृथ्वीवरील सर्वात पराक्रमी जीव नाही ! आपला तो गैरसमज आहे. मनुष्य आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर इतरांच्या पुढे आहे. ही बुद्धिमत्ता जशी तारक आहे तशीच मारकही आहे.

बुद्धिमत्ता जेंव्हा एव्हढी घमेंडखोर होईल की ती रडू शकणार नाही, इतकी गंभीर होईल की हसू शकणार नाही आणि इतकी आत्मकेंद्रित होईल की आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाची चिंताच करणार नाही, तर ती बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता राहत नाही. अहंकाराच्या आत्ममग्न कोषात गुंतत जाणाऱ्या माणसाच्या विदारक अंताचे ती कारण बनून राहते !

— समीर गायकवाड

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

UN-General-Assembly-300

संयुक्त राष्ट्राची आमसभा

संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात.

जगातील गरिब, ...

kalsubai

कळसूबाई शिखर

राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते.

सह्याद्री पर्वतावरील ...

Amboli-Hill-Station

अंबोली हिल स्टेशन

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० ...
sugar

साखर उद्योग

महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे.

सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची ...

Loading…

समीर गायकवाड यांच्याविषयी... 125 लेख
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*