भावना उद्‍वेग

आकाशाला शब्द भिडले,
हृदयामधले ।
भाव मनीचे चेतविता,
स्फोटक बनले ।।१।।
देह जपतो हृदयाला,
सदा सर्व काळी ।
धडकन त्या हृदयाची,
असे आगळी ।।२।।
जमे भावना हलके तेथे,
एकवटूनी ।
सुरंग लागता तीच येई,
उफाळूनी ।।३।।
कंठ दाटता
जीव गुदमरे आत ।
रंग बदलती चेहऱ्यावरले,
काही क्षणात ।।४।।
उद्‌वेग बघूनी शरीर,
कंपीत होते ।
हृदयातील भाव जाऊनी,
मन हलके होते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.comमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
paithani-sarees-2-300

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या ...
satara-wai_ganapati-300

कृष्णाकाठचे वाई

वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या ...
शुध्द सोन्याची बाजारपेठ जळगाव

जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.

जळगाव हे जिल्हा मुख्यालय ...

Loading…

डॉ. भगवान नागापूरकर यांच्याविषयी... 1005 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*