फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात….-

…अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस “चाललो हो शेट मी आता…” असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं.

….जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं

….आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं..

….गणपती विसर्जनाचे वेळी “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना कसलासा आवंढा दाटुन येतो..

…..असंच काहीसं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विझलेल्या पणत्या काढतानाही होतं..

 

….अनेक वर्ष आपण ज्यात आनंदाने काढली ती चाळ पाडली की त्या विटामातींचे ढिगारे बघवत नाहीत. उनवारा पावसापासुन आपलं रक्षण करणारे ते पत्रे बघितले की काहीतरी विचित्रच होतं..

….आठवडाभर आलेले पाहुणे निघाले की अजुनही त्यांच्या चपला लपवाव्याश्या वाटतात रे…

…..शाळेच्या रम्य दिवसांपासुन स्मृतीत जपुन ठेवलेलं कोपऱ्यावरचं चिंचेचं झाड पावसाने पडलं की आपल्या आतमध्येही कसलीशी “पडझड” होते…

…..पहिला पाऊस आला की अजुनही सुट्टी संपल्याचं दु:ख होतं..

…..ट्रॅफिक सिग्नलला भर दुपारी उपाशीपोटी माय पोराला घेऊन भिक मागताना दिसली की आपल्याच पोटात खड्डा पडतो, तिच्या आणि त्या पोराच्या काळजीने..

…..बदली झाली म्हणुन गाव सोडुन जाणारे शाळासोबती पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसते ते दु:खंही असंच काहीसं…

…..अनोळखी लग्नात, कोणाचीही मुलगी सासरी जाताना आपला कंठ कशाला बुवा दाटुन येतो?

…..

…..या आणि अशा असंख्य Involvements जपत आपण आयुष्य काढतो…

…..कसलासा “ओलावा” कायम आपल्या सोबत असतो. बराचसा भिजवुन टाकणारा, पण कुठेतरी आपला एक कोपरा जिवंत ठेवणारा…..!महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

About Guest Author 500 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*