पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव

औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.

केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .

गावाचे आगळेवेगळे उपक्रम

१) गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.

२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.
ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.

३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो. त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.

४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.

५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.

६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.

७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वयीत आहे.

८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.

९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.

१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.

११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.

१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.

१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.

१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.

१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.

१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवण देतो.

१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.

१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.

१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही.

२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.

२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.

२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.

२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.

२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .

२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत.

२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*