पद्य आणि मृत्युविचार : भाग – १० / ११

जीवन , प्रेम , आनंद , वगैरे  ;  आणि मरणोच्चार  :

मरणाचा विचार-उच्चार can be with reference to a number of things, मग तें जीवन असो, प्रेम असो, राष्ट्रभक्ती असो,  वा अन्य कांहीं असो. आपण कांहीं उदाहरणें बघूं या.

Life hurts a lot

More than Death.

Death is not the greatest loss in life !

The greatest loss is

when the relationship dies and we are alive !

मी आजारी कळतां आले कधी न ते येणारे

दूर अंतरावरुनी दुर्लभ स्वर्गसुखाचे वारे

किति रे माझी पहा काळजी तयां वाटते कीव

थोर तुझे उपकार, ज्वरा हे, घेई आतां जीव ।।

  • गाथा सप्तशती (अनुवाद : राजा बढे )

(प्रथम शतकातील, ‘माहाराष्ट्री’ प्राकृतातील काव्यसंग्रह)

आज लाभल्यामुळे हृदय तव

विषहि कालचें झालें गोड .

  • बा. भ. बोरकर

असणें आतां असत असत

नसण्यांपाशी अडलें आहे

जिव्हाळ्याच्या चिता पेटवित

बरेंच चालणें घडलें आहे

  • कुसुमाग्रज

मरण्यांचें स्वप्नहि गोड

जगण्याचें स्वप्नहि गोड ।

  • बालकवी ठोंबरे

जगावसं वाटलं

म्हणून जगतो

इच्छेवाचून मरतो.

  • शिरीष पै

तुजसाठि मरण तें जनन

तुजवीण जनन तें मरण

… हे स्वतंत्रते ..

  • स्वातंत्र्यवीर सावरकर

लोग शहरों में ‘इलाही’ इस क़दर जीने लगे

जैसे उन के सर पे हरपल मौत का साया ही हो ।

  • इलाही जमादार

काँटेवाली तार पे किसने गीले कपड़े टाँगे हैं ?

ख़ून टपकता रहता है और नाली में बह जाता है ।

क्यों इस फ़ौजी की बेवा, हर रोज़ यह वर्दी धोती है ?

( बेवा – विधवा )

  • गुलज़ार

मरने का सलीक़ा आते ही

जीने का शऊर आ जाता है ।

( सलीक़ा – तमीज़, तहज़ीब .  शऊर – तारतम्य )

  • सिनेगीत ( साहिर : वक़्त )

ज़हर पी गए हम दवा के आते आते

बड़ी देर कर दी मेहरबाँ आते आते ।

  • मनोज ज्ञान (सिनेगीत)

 

वानगीदाखल एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.

*

(पुढे चालू) ….

— सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

 महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
beed-kankaleshwar-temple-300

ऐतिहासिक शहर बीड

बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी ...
pune-pimpri-chinchwad-manapa

पिंपरी – चिंचवड : पुण्याचे जुळे शहर

एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे ...
p-475-ThermalPowerstationBhusawal

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*