नवीन लेखन...

नेमकी दिशा…

ब्राह्मण द्वेष हि आजकालची प्रथा झाली आहे. त्यावर भाष्य करणारा हा सुंदर लेख WhatsApp वरुन व्हायरल झालाय..


सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि, “नेमकी दिशा” हा लेख फक्त आणि फक्त तरुण “ब्राह्मण वर्ग आणि त्यांची सध्यस्थिती आणि त्याची संभाव्य दिशा काय असावी” याभोवतीच फिरेल.

आज ब्राह्मण वर्गाच्या तरुण वर्गामध्ये तीन गट आढळतात.
१) रोजच्या गरजांसाठी झगडणारे
२) ज्यांची वडिलोपार्जित भरपुर संपत्ती आहे आणि ती उपभोगणारे (गर्भश्रीमंत)
३) नोकरदार नेमस्त वर्ग, नाकासमोर चालणारे.

बरं, तर सुरुवात करु…

१) झगडणाऱ्या वर्गापासुन सुरुवात करु…
ब्राह्मण समाजातही सर्व काही आलबेल आहे आणि त्यांची मुले चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात हा एक गैरसमज.

ब्राह्मणांमध्येही गरीब आणि अतिफाटके लोक आहेत. पण म्हणुन हाणामारी करणे, गुंडगिरी करणे हे प्रकार जवळपास शुन्य. हे चतुर असतात पण आर्थिक पाठबळाविना यांची कुचंबणा होते. स्वत: च्या कोषात हे इतके व्यस्त असतात कि सामाजिक भान जवळपास शुन्य पण मोठ्या कष्टाने हे वर यायचा प्रयत्न करतात. गुन्हेगारी क्षेत्रातील यादी काढली तर यांची नावे, “दुर्बिण घेऊन शोधावी लागतील.” अर्थात लहानपणापासुन जे संस्कार झाले असतात त्याचाच हा परिणाम….

२) गर्भश्रीमंत ब्राह्मण हा सुद्धा एक वर्ग आहे. यामध्ये शेतीवाडी भरपुर असणारे किंवा वाडवडिलांनी मोठा केलेला व्यवसाय चालवणारे हे मोडतात. यांची विशेषता हि कि, “गर्भश्रीमंत असले तरी मुजोरी दाखवणे, पत्नीला दारु पिऊन मारहाण करणे, कुणावर जोर जबरदस्ती करणे हे प्रकार जवळपास नाहीतच.” सामाजिक जाणिव असते आपल्या संवाद कौशल्याने प्रभावही पाडत असतात. पण बऱ्याचअंशी राजकीय दृष्ट्या उदासीन असतात. आणि काही ठिकाणी न घाबरता सामाजिक विषयांवर मतप्रदर्शनही करतात.

३) नेमस्त नोकरदार वर्ग…
हा वर्ग सामाजिक दृष्ट्या वरील दोघांपेक्षा सजग असतो. आजुबाजुला होणारा ब्राह्मण द्वेष हे स्वत: अनुभवतात त्याचा विचार करतात पण परत स्वत: च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात. आणि हा आजुबाजुला ब्राह्मण द्वेषी चाळे बघुन फक्त हसतात.एखादा वाईट प्रसंग अनुभवायला आला तरी ते “कासवाची कडक पाठीप्रमाणे सहन करतात, वाद घालत बसत नाहीत.”

बरं, तुम्ही म्हणाल वरील दोन वर्गांना हि जाणीव नसते का ???
तर त्याचे उत्तर असेल कि, “झगडणारे ब्राह्मण रोजच्या परिस्थितीत झगडण्यात इतके व्यग्र असतात कि असा एखादा प्रसंग आपल्यावर येऊन गेला हे त्यांच्या लक्षातही येत नाही, कारण ते विचार करण्याच्या मनस्थितीतच नसतात. आणि गर्भश्रीमंतांना शक्यतो असे अनुभव येत नाहीत.”

हे झाले तीन महत्वाचे प्रकार पण यासर्वांपेक्षा वेगळा आणि अपवादानेच आढळणारा एक प्रकार आहे. तो म्हणजे नडणारा ब्राह्मण, “हे उत्तराला प्रत्युत्तर देतात, ठकासी महाठक होतात, उद्धटाला उद्धट होतात.” असो….

या सर्वांची संभाव्य दिशा काय असली पाहिजे आजच्या परिस्थितीत ??? यावर मला काय वाटते हे लिहितो.

तर ब्राह्मणहो,
तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ब्राह्मण द्वेष हि आजकालची प्रथा झाली आहे. तुम्हाला जरी असे अनुभव आले तरी दुर्लक्ष करा स्वत: च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. पण लक्षात घ्या आपली शक्ति आहे ती म्हणजे आपली बुद्धि त्यामुळे उच्चविद्याविभुषित व्हाच, जर आपल्याला शिक्षणात रस नसेल तर वेळ वाया घालवु नका लगेच व्यवसाय सुरु करा, निदान त्या दृष्टिने प्रयत्न करा.

लक्षात घ्या,
अभ्यंकरांनी चर्मकाराचा उद्योग स्वीकारला आज “अभ्यंकर फुटवेअर अँड शुज” हे वलय तयार झाले आहे.
किर्लोस्करांनी नांगराचा लाकडी फाळ बनवण्यापासुन सुरुवात केली आज सत्तर देशांत किर्लोस्करांचे पंप आणि मोटर्स जातात.
डी. एस. कुलकर्ण्यांनी फोन पुसण्यापासुन सुरुवात केली पण आज “डी. एस. कुलकर्णी हा बांधकाम उद्योगातला दादा माणुस म्हणुन ओळखला जातो.”
चितळ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला आज पश्चिम महाराष्ट्रात चितळे उद्योगसमुहाकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसतो.
राहुल शर्माच्या मनात फक्त कल्पना आली, “तर अस्सल भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्स त्याने उभी केली.”
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्याबद्दल काय लिहावे ??? राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला हा माणुस….
गुगल सिईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्ट सिईओ सत्या नाडेला हे सुद्धा ब्राह्मणच आहेत. एक तामिळ ब्राह्मण आहे तर एक तेलुगु.

ब्रम्हवृंदहो,
बुद्धि काय करु शकते याची मुर्तिमंत उदाहरणे आहेत हि माणसे. लक्षात घ्या तुम्ही जग हाताळु शकता, सुंदर आणि सत्या यांच्या रुपात ते सिद्धसुद्धा झाले आहे. या आजुबाजुला होणाऱ्या ब्राह्मण द्वेषी माकडचाळ्यांकडे दुर्लक्ष करा. कर्तृत्ववान व्हा, उच्चविद्याविभुषित व्हा. पसरु दे तुमच्या बुद्धिचा सुगंध सर्वत्र…. जगाला स्वत: च्या पांडित्याचे वेड लावा. इतके कि त्या पांडित्याचे जगाला व्यसन जडले पाहिजे. संशोधन करा, व्यवसाय करा, नोकरी सुद्धा करा हरकत नाही पण जिथे नोकरी करताय तिथे आपला कार्यशैली अशी ठेवा कि तुम्ही त्या कंपनीचे सिईओ झाला पाहिजे.

ब्राह्मण द्वेष करणाऱ्यांना त्यांची जागा तुमच्या कर्तृत्वातुन दाखवुन द्या.

लेख संपवताना एकच श्लोक आठवतोय….

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

अर्थात

विद्वान व्यक्तिची आणि राजाची कधी तुलना होऊ शकत नाही. राजा हा त्याच्या देशात आदरणिय असतो तर विद्वान जगात सर्वत्र वंदनिय असतो.

ब्राह्मणांनो विद्वान व्हा, वंदनिय व्हा….

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..