दिव्यांची अमावस्या

रविवार २३ जुलै २०१७ रोजी दिव्यांची अमावस्या आहे. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर “ आम्हाला आमचे सण साजरे करू द्या “ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये. या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात

पूर्वी या अमावास्येला मांसाहार केल्यावर तो गौरी जेवणापर्यंत बंद ठेवला जाई. कारण–

१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.

२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळातच जर प्राण्यांची हत्या केली तर त्याचा निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी बंद ठेवतात. सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

३) बाहेरच्या वातावरणामध्ये प्राण्यांच्या शरीरावर आणि शरीरात अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवतांना त्याचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४)  वातावरणात ओलावा असतो. मांस आणि मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या संख्येतील जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

या काळातील मांसाहार बंदीला धार्मिक कारण दिले की तो अधिक कसोशीने पाळला जाई. साहजिकच वर्षभरात केवळ याच काळात उगवणाऱ्या आणि प्रकृतीला अत्यंत पोषक आणि दुर्मिळ भाज्या, शाकाहारामुळे आपोआपच खाल्ल्या जातात. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी.

— मकरंद करंदीकरमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
शुध्द सोन्याची बाजारपेठ जळगाव

जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.

जळगाव हे जिल्हा मुख्यालय ...

Ahmednagar-Harishchandragad-300

नाणे परत करणारा हरिश्चंद्र गड

अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन ...
572-sevagram-bapu-kuti

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा ...

Loading…

मकरंद करंदीकर यांच्याविषयी... 19 लेख
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*