दहा गोष्टी आरोग्याच्या

निरोगी आरोग्यासाठी १० उपयुक्त टिप्स…

  • सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद वाढायला फार मदत होते.
  • सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.
  • दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे किडणीसाठी धोकादायक आहे. अनावश्यक अतिपाणी म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.
  • हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते. ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते. कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.
  • रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
  • दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.
  • दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.
  • दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.
  • रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
  • सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...
p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 624 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*