टीम इंडियाचा ‘द वॉल’ – राहुल द्रविड

राहुलचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूर इथं एका महाराष्ट्रीय कुटुंबात या प्रतिभावान क्रिकेटपटूचा झाला. मात्र द्रविड कुटुंब कर्नाटकला वास्तव्याला असल्याने त्याचं शालेय शिक्षण बंगळुरूमधील सेंट जोसेफ बॉईस या शाळेत तर कॉलेज सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून झालं. शरद आणि पुष्पा या द्रविड दाम्पंत्याचा हा मुलगा अभ्यासात हुशार आणि सिनसिअर होता. याशिवाय त्याला क्रिकेटचीही तेवढीच आवड होती. राहुलने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली.

शालेय क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या राहुलला ३ एप्रिल १९९६ मध्ये प्रथम टीम इंडियासाठी दरवाजे उघडले. यानंतर त्याच वर्षी जूनमध्ये त्याची प्रथमच टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. यानंतर गेली जवळपास १५ वर्ष द्रविड टीम इंडियाचा एक भक्कम अविभाज्य घटक बनला आहे. त्याने अनेकदा टीम इंडिया संकटात असताना विकेटवर टिच्चून भारताची लाज राखली आहे. त्याच्या या चिकाटी आणि मेहनतीमुळेच त्याला ‘द वॉल’ ही बिरुदावली चिकटली.

द्रविडने आतापर्यंत १६२ टेस्टमध्ये ५२.८२ च्या सरासरीने १३ हजार अधिक रन्स केल्या आहेत. यामध्ये ३६ सेंच्युरी आणि ६३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर ३४४ वन-डेमध्ये त्याने ३९.१६ च्या सरासरीने १० हजार ८८९ रन्स केल्या आहेत. यामध्ये १२ सेंच्युरी आणि ८३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. द्रविडची बॅटिंगची शैली ही जगातिल सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. तंत्रशुद्धता हा त्याच्या बॅटिंगचा आत्मा आहे. याशिवाय मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची वागणूक ही कोणाही क्रिकेटपटूसाठी एक आदर्श आहे. एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरूद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणार्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनला. एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारने राहुल द्रविडला पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे.[१६] भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरूण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरवातीच्या गटातील खेळाडू आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडियामहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
572-sevagram-bapu-kuti

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा ...
p-539-harihareshwar-kalbhairav-temple-shiva-temple

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ ...
bhau-daji-lad-sangrahalay

भाऊ दाजी लाड संग्रहालय

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 1299 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*