ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर

दीपस्तंभ, रातराणी, पांडगो इलो रे, आसू आणि हसू, रमले मी अशी विविध विषयांवरील उत्कृष्ट नाटके देणारे प्रख्यात ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीला असतानाच लेखनाला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी झाला.

ऐंशीच्या दशकात मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली. त्यापूर्वी हौशी रंगभूमीवर एकांकिकाकार आणि नाटककार म्हणून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. जगन हं’, ‘आद्यंत इतिहास’ ही फँटसीच्या अंगाने जाणारी, काल्पनिक प्रदेशातील रुपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली होती. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके त्यांनी लिहिली.

निवृत्तीनंतरचे आयुष्य रत्नागिरीत व्यतीत केले. रत्नागिरीतल्या आपल्या वास्तव्यात येथील नाटय़ चळवळीने जोर धरावा, यासाठी त्यांनी हिरीरीने काम केले. येथील रंगकर्मीना सोबत घेऊन त्यांनी रत्नागिरीच्या नाटय़ चळवळीला स्थिर दिशा दिली. तरुणांनी या क्षेत्रात यावे आणि अभ्यासपूर्ण काम करावे, यासाठी मा.प्र.ल.मयेकर यांनी खूप प्रयत्न केले. नाटकाविषयी आवड, तळमळ जपणा-या तरुणांना ते स्वत: मार्गदर्शन करत असत.

प्र.ल.मयेकर यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम! भाषेच्या शुद्धतेचा आग्रह नेहमीच त्यांच्या बोलण्यातून, लेखनातून उमटायचा. भाषा शुद्ध बोलली, लिहिली जात नसल्याबद्दल ते अनेकदा खंत व्यक्त करायचे. आपल्या लेखनातून ती मांडायचे. मराठी भाषेचे उत्तम जाणकार असल्याने दूषित होत चाललेल्या भाषेचा सल त्यांच्या मनात होता.

कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशा सर्व प्रकारची नाटके प्र. ल. नी लिहिली. बीईएसटीतील नोकरीपासून त्यांनी नाटय़ लेखनाला सुरुवात केली. दशकभर एकांकिकाकार आणि नाटककार म्हणून हौशी रंगभूमी गाजवल्यानंतर ऐंशीच्या दशकात त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून त्यांचा उदय झाला.

रातराणी, सवाल अंधाराचा, रानभूल, तो परत आलाय, काळोखाच्या सावल्या, केला तुका न झाला माका, सुखा सैलाब, श्रीयुत नामदेव म्हणे, पांडगो इलो रे बा इलो, अंदमान, तक्षकयाग, रमले मी, आसू आणि हसू, अब्द शब्द, शांत-श्रांत, घोस्ट यासारखी अनेक रसांनी परिपूर्ण अशी अनेक नाटके त्यांनी मराठी रंगभूमीला दिली.

‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या. जी. ए. कुलकर्णी यांच्यानंतर प्रतिकात्मतेचा कथा, कादंबरी आणि नाटकांतून प्रभावी वापर करणारा लेखक म्हणून प्र. ल. नी आपला ठसा उमटवला होता. मा अस् साबरीन (अल्ला तुम्हे जो चाहो वो देगा), अथं मनूस जगनं हं आणि तक्षक याग ही प्र. लं. ची नाटके ही चिरंतन स्मृतीशिल्पे आहेत. ‘अथं मानूस जगनं ह’ आणि ‘मा अस साबरीन’ या प्र. लं.च्य वेगळय़ा शैलीतील नाटकांनी राज्य नाटय़ स्पर्धा गाजवली.

आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील सर्वाधिक नाटकं त्यांनी ‘चंद्रलेखा’ या संस्थे साठी लिहिली. यातील अनेक नाटकांनी महोत्सवी उच्चांक गाठला. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने प्र. लं. च्या नाटय़क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कार देऊन गौरवले होते. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती.

मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले. प्र.ल.मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला. मा.प्र.ल.मयेकर यांचे १८ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1741 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…